इंदापूर पत्रकार संघटना आक्रमक, पाचोरा येथील पत्रकारास महाराणीच्या घटनेवरून निषेध व्यक्त करत केली कारवाईची मागणी
(निलेश गायकवाड )
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुका संघटनेच्यावतीने आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी तहसीलदार व इंदापूर पोलीस प्रशासनास यांना सोमवार 14 ऑगस्ट रोजी लेखी निवेदन देण्यात आले.
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा आमदार किशोर पाटील यांनी अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडली. त्यानंतर संदीप महाजन यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच इंदापूर पत्रकार संघटनेच्या वतीने काळ्याफिती लावून इंदापूर नगरपालिकेपासून ते इंदापूर पोलीस स्टेशन व तहसील कचेरी पर्यंत पाय फेरी काडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी इंदापूर व परिसरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.