June 28, 2025 5:00 pm

भव्य वृक्षरोपण व स्मृति सोहळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर तालुक्यातील तमाम वृक्ष प्रेमी मित्रांना नमस्कार अल्पावधीत आपल्या लोकसंग्रही स्वभावामुळे तालुक्यात विशेषता युवकांमध्ये लोकप्रिय झालेले कै तपन भाई पटेल आपल्या सर्वांच्या मनाला चटका लावून अचानक आपल्यातून निघून गेले 17 ऑगस्ट हा त्यांच्या जन्मदिवस दरवर्षी आपण मोठ्या उत्सवाने व विविध लोकोपयोगी कार्यक्रमाने साजरा करीत होतो. हा दिवस युवकांना नवीन प्रेरणा व ऊर्जा देणारा असायच्या आज तपनभाई आपल्यात नाही

त्यांच्या वाढदिवस जयंती म्हणून साजरा करण्याची वेळ आपल्यावर आली असली तरी हरणे हे तपन भाईंच्या स्वभावात नव्हते जिद्दीने पुढे जाणेच त्यांना माहित होते त्यांच्या स्वभावानुसार आपणही पुढे जाण्याच्या संकल्प केला आहे.वृक्षारोपण कै तपनभाई यांच्या आवडता छंद म्हणून त्यांची जयंती वृक्षारोपणाने साजरी करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे 17 ऑगस्ट रोजी तपनभाई फ्रेंड सर्कल मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व भूपेशभाई ग्रीन आर्मीच्या संयुक्त विद्यमानाने अति भव्य असा वृक्षरोपण स्मृति सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून असली येथे हजारो वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे हे तपनभाईंच्या स्मृतीस खरे अभिवादन ठरणार आहे.आपण सक्रिय सहभाग घ्यावा ही नम्र विनंती.

ठिकाण: असली तालुका शिरपूर जिल्हा धुळे

वेळ: दुपारी 3 वाजता

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!