इस्त्रोच्या भावी शास्त्रज्ञाला एसटी कर्मचाऱ्यांकडून अनोखी भेट..
धुळे: एसटीच्या प्रवासात चालक वाहकांना अनेक वेगवेगळे अनुभव येतात. इगतपुरी-धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटीतील चालक वाहकांना असाच एक वेगळा अनुभव आला. तो त्यांच्या शब्दात मांडलेला आहे….
कालची घटना…सकाळी माझे चालक P R खाडे, व मी वाहक G H शिंदे, दुपारी 12:45 वाजता इगतपुरी कसारा ही कामगिरी करत होतो, तिथुन आमची गाडी कसारा- धुळे असा प्रवास करणार होती.. तर आम्ही कसारा येथे गेलो असता, सर्व प्रवाशी गाडीतून उतरले व मी पाऊस जास्त असल्या कारणाने, बसच्या खिडक्या बंद कराव्या या हेतुने मागे गेलो असता, मला एक बॅग आढळली. मी, माझे चालक पी. आर. खाडे, यांना सापडलेल्या बॅग बद्दल सांगितलं. आम्ही सदर बॅग परत करण्याच्या हेतुने बॅग खोलून बघितली, तर राजरत्न प्रभाकर कोकाटे या इसमाची बॅग आहे, असे कळले, (बॅगमध्ये सापडलेल्या त्यांच्या ओळख पत्रावरून कळाले) त्यांचे गाव, एकलहारा (ता, संग्रामपूर जि. बुलढाणा) असा पत्ता आढळला, त्याच्यावर जे फोन नंबर होते, ते दोन्हीही नंबर बंद लागले….नंतर आम्हाला सदर बॅग मध्ये नंबर शोधत असताना, त्याच्या भावाचा नंबर मिळाला. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला व त्यांना बॅग मिळाल्याची माहिती दिली. मग माझे चालक, पी. आर. खाडे, यांनी वारंवार कॉल करत असताना त्यांच्या लक्षात आले की सदर फोनला रिचार्ज नाही… श्री खाडे यांनी त्या मुलाच्या दोन्ही नंबर ला प्रत्येकी 160 व 320 चा रिचार्ज केला. पुन्हा त्या मुलाशी आम्ही संपर्क केला. यावेळी फोन लागल्यावर त्या मुलाने सांगितलेली हकिकत आम्हाला धक्का देणारी होती. तो म्हणाला. “माझी बॅग नाशिक ते इगतपुरीच्या दरम्यान ट्रेन मधून कोणीतरी चोरली आहे, तशी तक्रार मी रेल्वे पोलीस ठाण्यात केली आहे.” मग आम्ही त्याला कळवले की तुझी बॅग आम्हाला सापडली आहे… त्या बॅग मध्ये आतल्या कप्प्यात 14000 हजार रुपये होते, व त्याचे पर्यंतचे सर्व ओरिजनल पासून ते ग्रॅज्युएट हे सर्व ऐकल्यावर त्या मुलाने थेट बॅग घेण्यासाठी धुळे गाठले. धुळे येथे आल्यावर तो मुलगा आम्हला म्हणाला ..” जर मला माझी बॅग मिळाली नसती तर आत्महत्या करणार होतो! ” दुदैवाने तो मुलगा दिव्यांग आहे. विशेष म्हणजे तो सध्या जिल्हा परिषद हिंगोली येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. पुढे आम्ही त्याची चौकशी केली असता, त्या मुलाची निवड इस्रो मध्ये झाली आहे, असे आम्हाला त्याच्याकडून कळले त्या नोकरीच्या डाकूमेंट व्हेरिफिकेशन (कागदपत्रे पडताळणी) साठी तो मुबंई ला निघाला होता! मजेशीर गोष्ट म्हणजे ज्या चोराने ही बॅग चोरली त्याने वरच्या कप्प्यात 1700 रुपये होते. ते काढून घेतले व ती बॅग बस मध्ये सोडून गेला…. (श्री. गोरख शिंदे, वाहक – एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील पण एखाद्याचा जीव वाचवून त्याला चांगल्या भविष्यासाठी नवी संधी निर्माण करून देण्याचे भाग्य या घटनेतून या चालक वाहकांना मिळाले! ही खूप मोठी गोष्ट आहे . या त्यांच्या कामगिरीबद्दल सर्व एस टी कुटुंबामध्ये त्यांचे कौतुक होत आहे.