July 1, 2025 4:07 am

किल्ला वेस येथील धोकादायक विद्युत खांबाचे अखेर स्थलांतर

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा येथील मुख्य किल्ला वेस येथील विद्युत खांब धोकादायक झाल्याने लोकप्रिय हनुमान तरुण मंडळ, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड व किल्ला वेस येथील रहिवासी यांच्या प्रयत्नातून धोकादायक खांबाचे अखेर स्थलांतर करण्यात आलेले असल्याने या सर्वांनी शाखाधिकारी आर. बी. शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी उपस्थितांनी शिंदे यांचे आभार मानताना सांगितले की, या ठिकाणी तीन शाळा असुन अनेक विद्यार्थी व पालक या ठिकाणाहून ये जा करीत असतात तसेचछत्रपती शिवाजी महाराज जयंती, गणेशोत्सव मिरवणुक, खोलेश्र्वर नंदी मिरवणुक, राम नवमी उत्सव मिरवणुक विविध मिरवणुका या मार्गावरून मार्गस्थ होत असतात. सदरच्या धोकादायक खांबामुळे अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. परंतु शाखाधिकारी शिंदे यांनी या सर्व बाबींची दखल घेऊन उचित कार्यवाही केल्या बद्दल सर्वांनी शाखाधिकारी शिंदे यांचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!