June 30, 2025 11:34 pm

किल्ला वेस करमाळा मधील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय येथे महसूल दिन साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल व वन विभाग मार्फत राबविण्यात आलेल्या दि. ०१ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट महसूल सप्ताह अंतर्गत किल्ला वेस, करमाळा येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय येथे महसूल दिन साजरा करण्यात आला. यामध्ये नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, अज्ञान पालक कर्त्याचे नाव कमी करणे, एकत्र कुटुंब पुढारी/ मॅनेजर कमी करणे, ई करार नोंदी, बोजा कमी करणे, बोजा दाखल करणे, विश्वस्ताचे नाव कमी करणे,आदी महसूल विषयक विविध योजना ची माहिती तलाठी कार्यालयाकडून देण्यात आली.तसेच नागरिकांच्या फेरफार संबंधी नोंदी निर्गत करून 7/12 उतारे देण्यात आले.

यावेळी महसूल नायब तहसीलदार शैलेश निकम, करमाळा महसूल मंडळ चे मंडळ अधिकारी आर. एच. राऊत, तलाठी सतीश बिजले, संजय गांधी अव्वल कारकून सादिक काझी भाऊसाहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती करमाळयाचे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे व नगरसेवक संजय सावंत, उद्योजक सुनील फुलारी, विजुभाऊ सुपेकर, नागेश कांबळे चेतन ढाळे, राजू कुंभार, समीर बागवान यांचे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!