June 30, 2025 6:42 pm

ग्रामविकासमंत्रीच्या बुडाखाली घरकुल भ्रष्टाचार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रामविकासमंत्रीच्या बुडाखाली घरकुल भ्रष्टाचार!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शहापूर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात गायरान जमीन गट ३०७ मधे६० प्लॉट सरपंच व ग्रामसेवक यांनी विकून टाकले.हे सर्व प्रकरण गिरीश महाजन यांना माहिती नसल्याची शक्यता आहे काय?
एक ग्रामस्थ भगवान दगडू पाटील हायकोर्टात गेले.आदेश मिळवला.सर्व गट ३०७ मधील जमीन रिकामी करा.
पण आणखी एक पाप महाजन यांच्या बुडाखाली झाले.
ग्रामसेवक, सरपंच,बीडीओ यांनी कलेक्टर ची परवानगी न घेता त्याच ३०७गटात घरकुल पात्र लाभार्थ्यांना घरकुल अनुदान दिले.ते राहात आहेत.आता कोर्ट आदेश नुसार ते पाडण्याचे उपद्व्याप चालू आहेत.म्हणून हे प्रकरण आम्ही हाताळत आहोत.
गायरान जमीन गट ३०७ची बोगस विक्री करून प्रत्येकी २५ हजार घेऊन ६० लोकांकडून पैसे उपटले.अशी माहिती भगवान पाटील यांनी थेट पोहचवली.त्याची कुठेही नोंद होऊ नये म्हणून या गटाचा कुठेही उल्लेख केला नाही.ग्रामसेवक सांगतात की,मला कागदपत्रे सापडत नाहीत.बीडीओ म्हणतात,मी आजारी आहे.
कलेक्टर ची परवानगी न घेता पांच पात्र लोकांना घरकुल साठी तोंडी जागा देऊन टाकली.अनुदान सुद्धा दिले.घरे बांधली.ते राहात आहेत.आता म्हणे पाडून टाका.रस्त्यावर राहा.
तसेच अपात्र लोकांकडून पैसे उकळण्यासाठी तोंडी जागा विकून टाकली.त्याच पैशांची वाटणी वरून ग्रामसेवक ,सरपंच व आजी माजी सदस्य यांच्यात वाद झाले.प्रकरण कोर्टात पोहचले.आदेश मिळवला.सर्व जागा खाली करा.आता पुन्हा वाद सुरू झाला.
१) घरकुल अपात्र लोक पैसे परत मागत आहेत.
२) घरकुल पात्र लोकांना घरकुल पाडायची नोटीस दिली आहे.
घरकुल बांधलेले,राहाणारे लोकांकडून सुद्धा दहा हजार रुपये वसुली केली होती.सरपंच व ग्रामसेवक ला दिली होती.ते पैसे आता बोभाटा झाल्यानंतर परत करून दिले.
हा सर्व गैरप्रकार आताचे ग्रामसेवक,बीडीओ, तहसीलदार, कलेक्टर यांनी मान्य केला आहे.पण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.आता पैसे घेणारे सरपंच व ग्रामसेवक सांगतील की,२५०००×६०=१५००००० इतकी रक्कम कोणी कोणी वाटून घेतली.
हा गैरप्रकार ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात,यांच्या घरापासून आठ किलोमीटर शहापूर गावात घडलेला आहे.
मध्यंतरी घरकुल पात्र लोक व अपात्र लोक गिरीश महाजन यांना अनेक वेळा भेटून समस्या मांडत होते.तरीही म्हणतात,मला काहीच माहिती नाही.तर मग,मला ,जळगाव ला राहणाऱ्या माणसाला कसे माहित पडले?
यांची कागदपत्रे आम्ही मिळवली.शहापूर गावी जाऊन प्रत्यक्ष भेट व पाहाणी केली.गिरीश महाजन यांची भेट मागितली.ते जामनेर ला असूनही नाकारली.नाकारण्याचे काहीतरी
कारण असेलच.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!