July 1, 2025 4:08 am

तोतया पोलीस अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

तोतया पोलीस अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणारा स्थानिक गुन्हे शाखे कडून जेरबंद

प्रतिनिधी – संदीप कायगुडे
दिनांक २८/०७/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेर सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे सतिष काशिनाथ झोजे हा पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणुक करत असतो. तो सध्या स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. १२ एच. व्ही. ९०८१ ही मध्ये सिटी लॉन्स पाईपलाईन रोड अहमदनगर येथे उभा असून गाडी मध्ये डॅश बोर्डवर पोलीस ऑफीसर कॅप टेवलेली आहे अशी बातमी मिळाल्याने पोनि / श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत हजर असलेले पोहेकॉ / अतुल लोटके, पोना/सचिन अडबल, रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर गवांदे, पोकॉ/ रणजीत जाधव, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांना नमूद इसमास ताब्यात घेवून खात्री करून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना देवून पथकास तात्काळ रवाना केले.

पथकाने लागलीच सिटी लॉन्स पाईपलाईन रोड अहमदनगर येथे १६.३० वा. जावून खात्री करता सदर ठिकाणी रोडच्या कडेला एक स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. १२ एच. व्ही. ९०८१ दिसून आल्याने गाडीजवळ उभा असलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने सुरूवातीस त्याचे नाव पोलीस उप- निरीक्षक सतिष काशिनाथ झोजे नेमणुक पोलीस मुख्यालय अहमदनगर असे असल्याचे सांगितले. पथकाने त्यास त्याचे ओळखपत्र दाखविणेबाबत कळविले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवून काहीएक समाधानकारक माहिती दिली नाही. त्यावेळी पोलीस पथकाने त्याचे नावाचा कोणी पोलीस अधिकारी पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस आहे का याबाबत माहिती घेतली असता सदर नावाचा कोणीही पोलीस अधिकारी नेमणुकीस नसल्याची माहिती मिळाल्याने त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सतिष काशिनाथ झोजे वय-२९ वर्षे हल्ली रा. ढवणवस्ती, तपोवनरोड अहमदनगर मूळ रा. मालुंजा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची व त्याचे ताब्यातील गाडीची पंचासमक्ष झडती घेता त्याचे कब्जामध्ये सतिष काशिनाथ झोजे परि. पोलीस उप-निरीक्षक या नावाची नेम प्लेट लावलेला, टोपी त्यावर राजमुद्रा असलेला मोनोग्राम, बेल्ट, बूट, लाईन यार्ड, असा पोलीस उप-निरीक्षकाचा संपूर्ण गणवेश व स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच.१२ एच. व्ही. ९०८१ असे ताब्यात घेण्यात आले असून त्याबाबत तोफखाना पोस्टेला पोकों/अमृत आढाव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोस्टे गु.र.नं १०८६/२०२३ भादवी

कलम १७०,१७१, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास तोफखाना पोस्टे करीत आहे. सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!