करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) – श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल च्या वेताळ पेठ येथील दुसऱ्या शाखेमध्ये रेनी डे सेलिब्रेशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मनीषा साठे, सौ ज्योती मुथा, सौ सुजाता मोरे ,सौ शितल देवी, सौ दीपिका देवी या होत्या. पाहुण्यांचे स्वागत छोट्या चिमुकल्यांनी ढोल वाजवून केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचा शाळेच्या सर्वेसर्वा सौ सुनीता देवी मॅडम, मुख्याध्यापिका सौ मोहिते मॅडम व ढाळे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रेनी डे सेलिब्रेशन ही एक आगळीवेगळी कल्पना प्रथमच शाळेमध्ये राबवण्यात आली. मुलांना आपण शाळेमध्ये ऋतू हे तर शिकवतोच पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल त्याचा कसा अनुभव घेता येईल याची संधी मुलांना उपलब्ध करून देण्यात आली. रंगीबिरंगी छत्र्या व रेनकोट यामुळे मुले खूपच खुश होती. शाळेच्या परिसरातील ढग ,रेनबो ,रेन ड्रॉप ,पेपर बोट यांचा वापर करून पावसाळी वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती. या कार्यक्रमांमध्ये रेनी सीजन मध्ये कोणकोणते महिने येतात, कोणत्या भाज्या ,कोणती फळे उपलब्ध असतात तसेच आपण या सीझनमध्ये कोणते कपडे वापरतो, कोणते खाद्यपदार्थ खातो, याविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुलांनी पावसाळी गाण्यांवर डान्स करून कार्यक्रमाचा आनंद लुटला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शेख मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन चोपडे मॅडम यांनी मांडले.