June 30, 2025 4:34 pm

दौंड तालुक्यातील खाजगी आणि सरकारी शाळेतील स्वच्छता गृह अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त ……! …….अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा आरोप

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड तालुक्यातील खाजगी आणि सरकारी शाळेतील स्वच्छता गृह अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त ……!
…….अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा आरोप

प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58

दौंड – दौंड तालुक्यातील व शहरातील खाजगी आणि सरकारी शाळा मधील स्वच्छतागृह हे अतिशय अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे लहान मुलांच्या स्वच्छतागृहात तुंबलेले गटारे हात धुण्यासाठी वॉश बेसिन नसणे कचरा तसेच मुलींच्या स्वच्छतागृहात वापरलेले सॅनिटरी नॅपकिन टाकण्याचे व्यवस्था दिसून येत नाही शाळा व्यवस्थापन या गोष्टीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे लाखो रुपये खाजगी शाळा पालकांकडून डोनेशन ट्युशन फी म्हणुन आकारत आहे परंतु त्या मानाने शाळा व्यवस्थापन सुविधा देण्यास कमी पडल्याचे दिसत आहे असा असंख्य तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यालयात आल्या असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे गणेश जगताप यांनी सांगितले आहे व त्या मध्ये तातडीने सुधारणा व्हावी यासाठी चे निवेदन राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे मेलद्वारे केले आहे. शाळा व्यवस्थापन यांना सक्त सूचना देण्यात याव्यात की लहान मुला मुलींचे स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यात यावेत शाळेतील महिला शिक्षिका व शिक्षक यांना स्वच्छ व निर्जंतुक वेगळे असे स्वच्छतागृह आहेत मग लहान मुला मुलींनाच वेगळी वागणूक का दिली जाते त्या अनुषंगाने स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी योग्य ते कर्मचारी उपलब्ध करावे सूचना केलेल्या आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!