June 29, 2025 2:25 pm

लिंगाळी गावच्या विद्यमान पोलीस पाटील सौ अश्विनी बगाडे यांचा अभिनव उपक्रम.

अपनी भाषा में पढ़े! Translate

लिंगाळी गावच्या विद्यमान पोलीस पाटील सौ अश्विनी बगाडे यांचा अभिनव उपक्रम.
115 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
प्रतिनिधी / विकी ओहोळ
8446119158

दौंड – विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी अभ्यासाची सवय लागावी यासाठी गेले पाच वर्षापासून शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम चालू आहे. लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील मसनेरवाडी या गावचे पोलीस पाटील सौ अश्विनी विजय बगाडे व ग्रामपंचायत यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना अभिनव वही शालेय साहित्य व नैसर्गिक समतोल राखून ठेवणारे झाडे (वृक्ष) वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम शाहूनगर (जगदाळे वस्ती) येथे करण्यात आला.
यावेळी येडेवाडी, मसनेरवाडी व शाहूनगर या ठिकाणचे विद्यार्थी एकत्र आले होते या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले
कार्यक्रमास महेश भागवत, सुनील जगदाळे पाटील सरपंच,पोलिस पाटील अश्विनी बगाडे मान्यवरांचे भाषण झाले यावेळी एकूण 115 विद्यार्थ्यांना दोन वह्या, एक पेन,पेन्सिल, एक पट्टी ,खोडरबर, शार्पनर असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमास किरण धुके अंमलदार अरुण साबळे अध्यक्ष तंटामुक्ती अमीर शेख ग्रामसेवक लिंगाळी आबासो वेदने विकणे भावसो येडे निलेश जगताप उपसरपंच वैजंता ताई सुधाकर चितारे उपसरपंच नितीन चितारे सदस्य ग्रामपंचायत लिंगाळी नीता वाघमारे पोलीस पाटील लिंगाळी सुधाकर लोंढे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सचिन सोनवणे मसनेरवाडी सुशांत शेंडगे आदी मान्यवर व गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला प्रवीण काळे सर यांनी सूत्रसंचालन केले व शिक्षक वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!