तो पठाण वारकऱ्यांसाठी सलग 9 वर्षापासून करतो आहे मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत.दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पांडुरंगाच्या व संत मंडळीच्या कृपाशीर्वादाने दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात विठूनामाच्या गजराने संपन्न झाला.
शहराची नामांतरे, जातीय-धार्मिक तेढ पसरवणाऱ्या अफवांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, हिंदू आक्रोश मोर्चा, व्हॉट्सअपची स्टेटस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रात अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढत चाललेल्या आपण पाहिल्या. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील गरड पाटोदा येथे काही सकारात्मकही घडताना दिसत आहे ते म्हणजे आषाढीवारीतील हिंदू-मुस्लिम ऐक्य कोणतेही जात पात न मानता सरपंच गफ्फार पठाण हे सलग नऊ वर्षापासून पाटोदा व परिसरातील भाविकांसाठी पंढरपूर दर्शनाचे आयोजन करत असतात.
गफ्फार भाई पठाण हे स्वखर्चाने पंढरपूर दर्शन सोहळ्याचे आयोजन करून वारकरी बांधवांसाठी फराळ, पाणी, चहा व नाष्ट्याची सोय करत असतात. तसेच या सर्व भक्तांना दर्शनाला जाण्यासाठी गाड्यांची मोफत व्यवस्था करतात. एक मुस्लिम बांधव हिंदू समाजातील वारकऱ्यांना पंढरपूर दर्शन मागील नऊ वर्षापासून घडवीत आहे हे खरे हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रत्येक म्हणावे लागेल.
यावेळी सरपंच गफ्फार भाई पठाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सर्व धर्मीयांना एका छताखाली आणणारा सोहळा म्हणून पंढरपूरची आषाढी वारी जगभर ओळखली जाते. हाच उद्देश मनामध्ये ठेवून मी काम करत आहे यासाठी मला माझे सहकारी मित्र परिवाराची खूप मोठे योगदान होत असते कल्याण कवादे, सुखदेव शिकारे, हौसराव थोरात, प्रकाश कडू, विष्णू भवर, अशोक खाडे, बापूसाहेब बडे, बाबासाहेब गरड पाटील, बंडू कडू, विश्वनाथ मोरे, शहाजी साळवे आदी वारकरी बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आम्ही सर्व एकत्र येऊन पंढरपूर दर्शनाचे आयोजन करत असतो यामध्ये मला वारकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणावर मदत होत असते जोपर्यंत पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तोपर्यंत ही सेवा अखंडितपणे अविरत चालू राहील अशी इच्छा पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फार भाई पठाण यांनी व्यक्त केली.
शहराची नामांतरे, जातीय-धार्मिक तेढ पसरवणाऱ्या अफवांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, हिंदू आक्रोश मोर्चा, व्हॉट्सअपची स्टेटस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रात अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढत चाललेल्या आपण पाहिल्या. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील गरड पाटोदा येथे काही सकारात्मकही घडताना दिसत आहे ते म्हणजे आषाढीवारीतील हिंदू-मुस्लिम ऐक्य
कोणतेही जात पात न मानता सरपंच गफ्फार पठाण सलग नऊ वर्षापासून पाटोदा व परिसरातील भाविकांसाठी पंढरपूर दर्शनाचे आयोजन करत असतात.
त्या वारीचे आयोजन करत असताना वारकरी बांधवांसाठी चहापाणी नाश्ता व दर्शनासाठी जाण्यासाठी गाड्या यांची मोफत व्यवस्था करत असतात पंढरपूर आषाढी वारी मध्ये सर्व जात धर्म पंतांचे भाविक एकत्र येत असतात विठुरायाचे मनोभावे दर्शन घेत असतात.
या दिंडीचे आयोजन करण्यासाठी सरपंच गफार पठाण व त्यांचे मित्र मंडळी कल्याण कवादे, सुखदेव शिखरे, हौसराव थोरात, प्रकाश कडू, अशोक खाडे, विष्णू भवर, बाबासाहेब गरड पाटील, विश्वनाथ मोरे, राजेश साळवे, आधी मनोभावे साथ देत असतात या वेळी गफ्फार पठाण म्हणाले आपण यापुढेही अशीच सेवा करत राहु.