June 30, 2025 4:54 pm

मनिषा पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार …

अपनी भाषा में पढ़े! Translate

मनिषा पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार …

अमळनेर- दि. २९: राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जी चॅम्प अबॅकसचे उल्लेखनीय उल्लेखनीय यश मिळाले असून संचालिका मनिषा पाटील यांनाही व आदर्श शिक्षिका पुरस्का राने गौरविण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात गेनियन एज्युकेशन सोसायटी प्रा. लि. अबॅकस कंपनी च्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत अमळनेर शहरातील निकुंभ हाइट्स कॉम्प्लेक्स या भागात असलेल्या जि-चॅम्प अबॅकस अकादमीला सन २०२३ वर्षांतील संचालक मनीषा पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर अकादमीला एक महिना पूर्ण झाला असून १० जून रोजी झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत शुभम विलास पाटील याने ९९ मार्क मिळवून राज्यात तृतीय श्रेणीत घवघवीत यश संपादन केले. शुभमने १४ मिनिटे ५५ सेकंदात १०० पैकी ९९ मार्क प्राप्त केले.
सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गेनियनचे संचालक योगेश देशमाने व आरती देशमाने यांच्या हस्ते नुकताच पारितोषिक वितरण सोहळा संभाजीनगर येथे संपन्न झाला. सदर विद्यार्थ्यांला त्यांच्या संचालिका मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!