June 30, 2025 7:02 am

ढापे चोरीचा २४ तासात तपास…माळेगाव पोलिसांची दबंग कामगिरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

ढापे चोरीचा २४ तासात तपास…माळेगाव पोलिसांची दबंग कामगिरी..
.
बारामती (सह – संपादक- संदिप आढाव)
बारामती तालुक्यातील क-हावागज येथील जलसंपदा विभागाचे लोखंडी ढापे चोरीचा अवघ्या २४ तासात माळेगाव पोलिसांनी छडा लाऊन ३ आरोपीसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,क-हावागज ता.बारामती येथे शमीम खान यांच्या घराजवळ जलसंपदा विभागाने आपत्कालीन परिस्थितीसाठी ३३२ लोखंडी ढाप्यापैकी सवा लाख रुपये किंमतीचे २५ ढापे चोरीला गेल्याची तक्रार शाखाधिकारी राजेश्वरी विष्णू पाडवी (रा.इंदापुर) यांनी दिली होती.
माळेगाव पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलिस नाईक प्रविण वायसे व इतरांनी अवघ्या २४ तासात संतोष दिलिप शेलार, दत्ता अशोक लष्कर, सखाराम जगन्नाथ चव्हाण सर्वजण (रा.धायरी पुणे) यांना अटक करुन पाटबंधारे विभागाचे ४५ हजारांचे ९ ढापे जप्त केले.
सदर कामगिरी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे,माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय मोहिते, पोलिस नाईक रुपाली धीवार, पोलिस अंमलदार गणेश खंडागळे, ज्ञानेश्वर मोरे, नामदेव माने, श्रीकांत माने, हनुमंत शिंदे, अमोल राऊत, विजय वाघमोडे, राहुल पांढरे, अमोल कोकरे यांनी केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!