विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी;बंडगरवस्ती येथील शाळेत बाल दिंडीचे आयोजन
(निलेश गायकवाड )
मदनवाडी : विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली..असा हा विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले वारकरीशाळा-शाळांमध्ये अवतरले. ज्ञानाच्या मंदिरात भोळ््या विठ्ठलाची आळवणी झाली आणि शनिवारी बाल वारकऱ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला.महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भाविकांच्या लाडक्या विठूरायाची आषाढी एकादशी गुरुवारी होत आहे. महिन्याभरापूर्वी सुरु झालेल्या दिंड्या आता पंढरपुरात विठ्ठल भेटीसाठी विसावल्या लागल्या आहेत. एकादशीला आता काही दिवसाचा अवघी राहिला आहे.
मदनवाडी येथील (बंडगरवस्ती) प्राथमिक शाळांमध्ये शनिवारीच आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले मुलं-मुली शनिवारी मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळीला बुक्का, गळ््यात टाळ, आणि मुली नऊवारी, केसात गजरा, साजश्रृंगार, डोक्यावर तुळस अशा सुंदर वेशभूषेत आले.
एक मुलगा आणि मुलगी विठूराय व रखूमाई झाले. पठडीतल्या अभ्यासाला सुट्टी मिळाली आणि हे बाल वारकरी विठ्ठल भक्तीच्या शाळेत रमले. परिसरातून दिंडीकाढण्यात आली.तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वस्ती मुख्याध्यापक श्री विठ्ठल भोई ,सहकारी शिक्षिका सौ आशा वाघ ,श्रीमती सुप्रिया हेळकर ,अंगणवाडी ताई सौ संगीता कुंभार व सौ संगीता मारकड तसेच पालक वर्ग आदी उपस्थित होते.