औद्योगिक क्षेत्रातील ४० वर्षांचे बाळासाहेबांचे कार्य उल्लेखनीय….
औद्योगिक विश्वातील बाळासाहेब गौरव ग्रंथाचे प्रकाशन ,आजी – माजी आमदारांनी केले कौतुक
भिगवण(वार्ताहर): जीवन हे क्षणभंगुर आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाचा माणसाला आनंद घेता आला पाहिजे आनंद घ्या आणि आनंद द्या असे सांगत बाळासाहेब सोनवणे यांनी ४० वर्षांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य केल्याने ते जनमाणसांबरोबरच औद्योगिक क्षेत्रात सरस ठरले असल्याचे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले.
बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीचे महाव्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे यांचा सेवापूर्ती त्याचप्रमाणे औद्योगिक विश्वातील बाळासाहेब( ४० वर्षांची यशस्वी कारकीर्द ) या गौरवग्रंथाचे प्रकाशन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब सोनवणे, संपादक सविता सोनवणे,आर्सेलर मिल्सचे संचालक पी. आर. उपाध्यय,बिल्टचे उपाध्यक्ष नागेंद्र भट,भारत फोर्जचे सदाशिव पाटील,ॲड. सुधीर पाटसकर,आनंद कामोजी,शिवाजीराव खटकाळे,आबासाहेब बंडगर,आदित्य मेहता,नानासाहेब बंडगर,सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार,सचिन बोगावत,प्रमोद बंडगर,सीताराम खारतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार भरणे यांनी सोनवणे यांच्या ४० वर्षांच्या कार्याचा गुण गौरव करुन बिल्ट कंपनीत बाळासाहेबांनी खूप अडचणीच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन कंपनीला चांगला दर्जा मिळवून दिला तसेच आलेल्या अडचणी व त्यातून मात केल्याचे सांगितले. यावेळी डॉ . चंद्रकांत खानावरे,नितीन चितळकर,रणजीत भोंगळे,आर. एम जाधव,संतोष जाधव,इंदुमती गायकवाड अवचित मोरे,भारत फोर्जचे सदाशिव पाटील,तुकाराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ॲड. प्रशांत क्षीरसागर , संजय झोपे, संजय राणे, एस जी आपटे, कल्याण पवार, सतीश गायकवाड, भगवान जऱ्हाड, नाथसाहेब धुमाळ आदी उपस्थित होते. लावून एचआर क्षेत्रातील व्यक्तीचा अशा प्रकारे सेवा पूर्ती आणि पुस्तक प्रकाशन हा सोहळा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात संपन्न होत असल्याबद्दल सर्व मान्यवरांनी प्रशंसा केली.
या प्रसंगी सर्व स्तरातील प्रतिष्ठित व मान्यवर आवर्जून उपस्थित होते. बाळासाहेबांच्या या अगोदरच्या कंपन्यामधील नाशिक,रावळगांव,अहमदनगर,छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि भिगवण परिसरातील सर्व नागरिक, प्रतिष्ठित, कंपनीचे कामगार व अधिकारी वर्ग,रोटरी क्लब,सायकल क्लब,मेडिकोज असोसिएशन आणि सर्व संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात डॉ. काशिनाथ सोलनकर यांनी बाळासाहेब सोनवणे यांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन सोनाली साळुंके यांनी तर आभार संदीपान काळे यांनी मानले.
बाळासाहेबांची शिस्त व प्रशासनावर पकड – पाटील
बाळासाहेबांच्या अनुभवाचा फायदा सर्व औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व अधिकारी वर्गाला होईल. बिल्ट कंपनीत शिस्त व प्रशासन यावर पकड ठेऊन बाळासाहेब यांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडली असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गौरवोद्गार काढले त्याचप्रमाणे त्यांच्या फोरेव्हर २४ कन्सलटंट या नवीन फर्मला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीसाठी होईल असेही पाटील म्हणाले.
आजी माजी मंत्र्यांचे गौरवोद्गार —
कार्यक्रमाची सुरवात बाळासाहेब सोनवणे यांच्या स्वर्गीय आई वडिलांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून केली याचा आमदार भरणे यांनी त्याचप्रमाणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीदेखील कौतुक केलं. जो आपला इथपर्यंतचा प्रवास हा आपल्या आई- वडीलांच्या कृपेनेच झाला आहे याची जाणीव ठेवतो तो जीवनात यशस्वी होतो. यासाठी देव इतरत्र शोधण्याची गरज नसून तो आपल्या आई- वडीलांतच असतो हे या कृतीतून दाखवून दिल्याने भरणे व पाटील यांनी गौरव केला.