राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापनदिन राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती याठिकाणी झेंडावंदन करून साजरा…
बारामती (सह – संपादक – संदिप आढाव)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापनदिन राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती याठिकाणी झेंडावंदन करून व पेढे वाटून साजरा करण्यात आला.
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आलले.
याप्रसंगी बोलतांना पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्र पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शनाखाली काम करीत असताना आपण पक्षाची ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावीत. एक तास राष्ट्रवादी साठी हा उपक्रम प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिक शेतकरी ,युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहावेत. साहेब ही एक विचारधारा आहे. हा विचार जनमनात रुजवावा असे मनोगत तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त करून सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर,माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, मा.अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप,दूध संघाचे मा.चेअरमन संदिप जगताप,मार्केटचे सभापती सुनिल पवार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवळे,माळेगाव सह. साखर कारखाना व्हा. चेअरमन सागर जाधव, सोमेश्वर कारखाना व्हा.प्रणिता खोमणे, मार्केट संचालक शुभम ठोंबरे, दूध संघाचे मा. व्हा.चेअरमन राजेंद्र रायकर,मार्केटचे उपसभापती निलेश लडकत, खरेदी विक्री संघ व्हा.बाळासाहेब मोरे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष धनवान वदक, पीडिसीसी बँकेचे संचालक दत्तात्रय येळे,तालुका युवक अध्यक्ष राहुल वाबळे, माळेगाव राष्ट्रवादी युवा नेता रणजित उर्फ बंटीभैय्या तावरे, माजी सरपंच जयदीप तावरे, तालुका विदयार्थी अध्यक्ष तुषार कोकरे, तालुका सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे,दिव्यांग सेल चे अध्यक्ष हरिभाऊ जाधव, सुनिल जाधव, शिक्षक सेलचे अविनाश सावंत, सेवादलचे अध्यक्ष सुहास काळे, ओबीसी सेल चे अध्यक्ष दादाराम झगडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रोहन गायकवाड, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष अमरसिंह जगताप, भटक्या जमाती अध्यक्ष किसन तांबे, माजी सैनिक सेल अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, पदवीधर सेल अध्यक्ष शुभम तावरे, महिला सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संगिता पाटोळे,मा.उपसभापती प्रदीप धापटे,रोहित कोकरे, दूध संघ संचालक पोपटराव, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ विश्वस्त वसंतराव तावरे, रविंद्र थोरात तसेच जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे मा.अध्यक्ष संजय भोसले, ज्ञानदेव बुरुंगले सर, एन के जगताप सर, अनिल वाघमोडे, नितीन काकडे, सुयोग सातपुते, सागर देवकाते, राहुल तावरे, पैगंबर शेख, संतोष जगताप, राहुल चांदगुडे, राम गवळी, दादा जराड, शेखर गोंडे, दत्तात्रय मदने, निलेश जगताप,नाना भोसले आदिंसह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसंपच, सदस्य त्याचप्रमाणे पंचायत समिती-जिल्हा परिषद तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.