महावितरण च्या विरोधात पणदरे येथे शेतकऱ्यांचे आंदोलन..
बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेती शिवारातील पिके जळून चालल्याने बारामती तालुक्यातील पणदरे येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको करुन निषेध व्यक्त केला.
पणदरे बसस्थानक ते महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.यावेळी निरा बारामती रस्ता रोको करण्यात आले.यावेळी विक्रम कोकरे, विनोद जगताप, अरविंद बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कनिष्ठ अभियंता रोहित राख यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपनिरीक्षक देवीदास साळवे, पोलिस कर्मचारी नितिन कांबळे, सुशांत तारळेकर, विजय जगताप,अमर थोरात,अमजद शेख,काका पाटोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान दिवसा आठ व रात्री दहा तास वीज द्या,थ्री फेज चालू असताना भारनियमन करु नये,जेवढा वापर तेवढं वीज बिल द्या,वीज बिलात दुरुस्ती करावी, तांत्रिक घोटाळा झाल्यास विज बंद बाबत सोशल मीडियावर माहिती द्यावी या मागणीचे निवेदन अमित जगताप, वैभव निंबाळकर, ज्ञानदेव जगताप, संदिप कोकरे यांनी दिले.