‘I’m Unstoppable’,कर्नाटकातील काँग्रेसच्या आघाडीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया
(निलेश गायकवाड )
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकांचे कल समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस चांगलीच आघाडी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी एक व्हिडिओ ट्विट करत, मी अजिंक्य आहे, मला विश्वास आहे, आणि आज मी थांबणार नाही. असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्यांच्याबरोबर अनेक नेते देखील असल्याचं पाहायला मिळत आहे.