June 30, 2025 2:32 pm

राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनचे अध्यक्षपदी जयमंगल जाधव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हस्ते नियुक्तीपत्र

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनचे अध्यक्षपदी जयमंगल जाधव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हस्ते नियुक्तीपत्र

जालना (संतोष शिंदे)/- राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयमंगल जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आले आहे
घनसावंगी तालुक्यातील खडका गावचे उप सरपंच, सक्रिय क्रियाशील उपक्रमशिल तालुका युवक अध्यक्ष, आणि जिल्हा युवक कार्याध्यक्ष. जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा सदस्य म्हणून, अभ्यासू सदस्य ठसा उमटवला, शेतकरी कुटुंबातील अभ्यासू युवक कार्यकर्ता म्हणून जालना जिल्ह्यामध्ये ओळख असणारे जयमंगल जाधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद असोसिएशन पदी नियुक्ती मा.नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी झाली , विविध सामाजिक चळवळीमध्ये सहभाग असतो. अनेक समाज उपयोगी कामामध्ये पुढा कार असतो ते स्वतः आर्ट ऑफ लिविंग चे योग प्रशिक्षक म्हणून युवकांसाठी शिबिरे घेतात या सर्व बाबी मुळे 23 राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद राष्ट्रीय जिल्हा परिषद असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रसंगी बोलताना जयमंगल जाधव म्हणाले की एक ग्रामीण भागाच्या विकासासाठी युवकांचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा आहे नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं युवकांनी कोणावरही अवलंबून न राहता जर स्वतः पुढाकार घेतला तर लोक पुढे येतात . सक्षम आणि कायमस्वरूपी काम हे ग्रामीण भागामध्ये उभा करता येतं जे की आज ग्रामीण भागाची गरज आहे. आणि यासाठी सर्व युवकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा रास्त ठरवण्यासाठी भविष्यामध्ये आपण काम करून असा विश्वास त्यांनी या प्रसंगाने दिला.. युवकांमधील व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे त्यांची क्रयशक्ती वाढली पाहिजे त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणि रचनात्मकता वाढली पाहिजे यासाठी भविष्यामध्ये सतत कार्यरत राहणार असा विश्वास त्यांनी या प्रसंगाने दिला.. नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष जिल्हा परिषद असोसिएशन डॉ कैलास गोरे राष्ट्रीय सरचिटणीस बेरी सांगता हिमाचल प्रदेश राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरिता गाखरे उपस्थित होते.. या बद्दल घनसावंगी तालुक्यामध्ये माजी जिप अध्यक्ष महेन्द्र पवार शाम उढान श्रीराज राजाराम राजे जाधव देशमुख भास्कर वराडे दिगंबर ढेरे मनोज शिंदे मोहन रोडे नारायण धबडकर सुनील कोरडे आतीक बागवान मनोज शिंदे महेश मातमे ज्ञानेश्वर जाधव , दयानंद लालझरे,, नामदेव साबळे आदींनी अभिनंदन केले..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!