July 1, 2025 3:20 am

प्रताप महाविद्यालयात  विद्या भारतीचा प्रांत अभ्यास वर्ग उत्साहात सुरू

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात  विद्या भारतीचा प्रांत अभ्यास वर्ग उत्साहात सुरू

अमळनेर दि.११ मे – प्रताप महाविद्यालयात  विद्या भारतीचा प्रांत अभ्यास वर्गाचे ३ ते १३ मे दरम्यान सुरू असून त्या वर्गासाठी संघ दृष्ट्या देवगिरी प्रांतातील बीड, परभणी, जालना, संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक व पालक उपस्थित आहेत. दहा दिवसीय वर्गात पायाभूत शिक्षण व पाच दिवसीय वर्गात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण क्रियान्वयन या दोन प्रकारांमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. सकाळी पाच वाजेपासून प्रशिक्षणात सुरुवात होते. सकाळी अग्निहोत्रा नंतर प्रातःस्मरण ज्यात सात श्लोक आहेत, एकात्मता मंत्र व स्तोत्र, योगाभ्यासानंतर अल्पोपहार, त्यानंतर प्रशिक्षण सत्र होतात. आता पर्यंत पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गात झालेल्या सत्रांमध्ये पंचकोषात्मक विकास, व्यष्टी ते परमेष्टी विकास, शिशु शिक्षणाशी निगडित असणाऱ्या बारा शिक्षा व्यवस्थांचा परिचय, शाळेत घ्यावयाच्या क्रियाकलापांची माहिती व साहित्य निर्मिती कार्यशाळा, मातृभाषेतून शिशु शिक्षणाचे महत्व, शैक्षणिक खेळ, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान इ.  विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. तर अनौपचारिक सत्रामध्ये मैदानी खेळ, समाज जागृतीच्या दृष्टीने उद्बोधन करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण क्रियान्वयन वर्गात 21 व्या शतकातील कौशल्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आचार्यांची भूमिका, कला एकात्मिकरण, पंचकोश विकास, भारतीय ज्ञान परंपरा, अनुभवजन्य शिक्षण, शिक्षणात खेळण्यांचे महत्व इ. विषयांवर मार्गदर्शन करण्यात आहे. धोरणातील अपेक्षित बदलानुसार पाठ घेऊन दाखवण्यात आले. पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्ग संचालनासाठी सहा महिलांनी परिश्रम घेतले. त्यात प्रांत शिशु वाटिका प्रमुख वनमाला कुळकर्णी, प्रांत सह शिशुवाटीका प्रमुख सुरेखा सोनार, प्रांत सदस्य अभिलाषा संघई, कीर्ती देशपांडे,आरती नाईक, हर्षदा पाटील, महाराष्ट्र व गोव्याचे शिशुवाटिका  संयोजक भाई उपाले यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण क्रियान्वयन वर्गासाठी म्हणजेच

एन.ई.पी. वर्गासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय मंत्री डॉ. मधुश्री सावजी, क्षेत्र मंत्री शेषाद्रि डांगे, प्रांताध्यक्ष डॉ. विवेक वसंत काटदरे,  प्रांत मंत्री प्रकाश पोतदार, संघटन मंत्री शैलेश जोशी, जळगाव जिल्हा मंत्री ज्ञानेश्वर पाटील तसेच गजानन कोळी, सचिन गायकवाड, नितीन सोनवणे, जयेश देशमुख, ज्योती देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. नांदेड जिल्हा मंत्री कल्पना कांबळे, विभाग मंत्री प्रताप देशपांडे यांनी सूत्र संचालन केले. दहा दिवसीय वर्गात दोनशेच्या वर संख्या असून त्यांची सर्व व्यवस्था जिल्हाध्यक्ष प्रा.दिलीप भावसार,जिल्हा मंत्री प्रदीप गुजर, प्रा.धीरज वैष्णव,राजेंद्र निकुंभ, निलेश पाटील, संदीप ठाकरे, सुशील वाणी, दत्तात्रय नाईक, दिनेश नाईक यांनी व्यवस्था पाहिली.

 

 

प्रांत अभ्यास वर्गात चित्र प्रदर्शनी सर्व प्रशिक्षार्थींना आकर्षित करताना दिसत आहे. या प्रदर्शनीत १२ शिक्षण व्यवस्था यावर सविस्तर माहिती दिली असून  १३५ महापुरुषांची चित्र प्रदर्शनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!