प्रज्ञाशोध परीक्षेत जि. प. प्रा. शाळा नीरा नरसिंहपूर च्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश
नीरा नरसिंहपुर: दिनांक-11; प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पंचायत समिती इंदापूर, ता. इंदापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इ.3 री आणि इ.4 थी विद्यार्थांनी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यानिमित्त शाळेचे मुख्या. श्री देशमुख सर तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. कांबळे सर, सौ. शिंदे मॅडम, श्री. कोळी सर व श्री. खंदाडे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती, नरसिंहपूर चे अभिनंदन!
नीरा नरसिंहपूर येथील जि .प .प्राथमीक शाळा ही अतिशय उत्कृष्ट आणि छान आहे आणि येथील शिक्षक हे खूप मेहनती आणि हुशार आहेत याच्यामुळे या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि त्याच कारणामुळे येथील शाळा ही इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय प्रसिद्ध अशी शाळा आहे.