युवकांचे अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी जनजागृती अभियान
ड्रग्ज फ्री नागपूरचा संदेश
नागपूर : सुरेश भट्ट सभागृहात युवकांमधील अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी ‘ड्रग्ज फ्री नागपूर’ जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित सत्राच्या माध्यमातून मादक पदार्थों माहिती देण्यात आली. तसेच त्यांना विविध समस्यांना तोंड देण्याच्या युक्त्या सांगण्यात आल्या. कॅलिबर नोव्हा कोचिंग क्लासेस मेगा बिझनेस इव्हेंट व्यापार क्लास चे संस्थापक राहुल राय आणि पंकज अग्रवाल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या तज्ज्ञांनी युवकांना अंमली पदार्थ सेवनाच्या हानीबाबत जनजागृती करण्यास प्रवृत्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिषेक दुधलकर व सदस्य उपस्थीत होते व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रुती त्रिपाठी यांनी केले.