July 1, 2025 4:40 am

पुष्पा-झुकेंगा नही साला,हाॅटेलमध्ये खुन….

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुष्पा-झुकेंगा नही साला,हाॅटेलमध्ये खुन….

नंदुरबार रोडवरील,१३२ केव्ही समोरील,सुभाष चौधरीच्या राहते घर भाडेतत्त्वावर हाॅटेलसाठी दिलेल्या ठिकाणी झालेला प्रकार…

मयत आचारी हा चाळीस वर्षांच्या आतील….

दोन आचारीमधील भांडणामुळे,खुन झाल्याचा प्राथमिक कयास…

दोंडाईचा- येथे आज सकाळी नंदुरबार रोडवरील १३२ केव्हीसमोरील सुभाष गणपत चौधरी यांचे राहते घर भाडेतत्त्वावर हाॅटेलसाठी दिलेल्या “पुष्पा,पुष्पा राज-में झुकेंगा नही साला”,ह्या दोन वर्षापुर्वी लाॅकडाऊनमध्ये सुरू झालेल्या जेवणाच्या हाॅटेलमध्ये एक मध्यप्रदेश राज्यातील,व्यवसायाने आचारी असलेल्या चाळीशीच्या आतील वयाच्या माणसाचा चाकूने पोटात भोचकलेल्या अवस्थेत शव मिळून आले आहे.आज सकाळी हा प्रकार बाजूला झोपलेल्या किशोरवयीन वेटरच्या लक्षात आल्यावर,त्याने आरडाओरड करून पायी फिरणाऱ्या लोकांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर भाडेतत्त्वावर घर-हाॅटेल घेतलेले मालक व दोंडाईचा पोलीस तातडीने तेथे पोहचले होते. कालरात्री उशीरा एक वाजेनंतर हाॅटेल बंद केल्यावर हा खुनाचा प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे.त्यात पाळधी जळगाव येथील एक वेटर रात्रीपासुन गायब असुन त्याचा मोबाइल नंबर ही बंद येत आहे.तरी स्थानिक पोलीस सी.सी.टी.व्ही.फुटेजच्या आधारे पुढील तपासाला गती देत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!