June 30, 2025 3:39 am

आमदारांनी दिलेल्या शब्दाला न्याय दिला दौंड न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) दिवानी न्यायालय सुरू होणार!

अपनी भाषा में पढ़े! Translate

आमदारांनी दिलेल्या शब्दाला न्याय दिला
दौंड न्यायालयामध्ये (वरिष्ठ स्तर) दिवानी न्यायालय सुरू होणार!

प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. न.- 8446119158

दौंड – अनेक दिवसांपासून येथील न्यायालयात दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन व्हावे असे समस्त वकील संघटनेची व नागरिकांची मागणी होती व त्यासाठी आमदार राहुल कुल हे प्रयत्न करत होते त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे या कामाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे आज मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व त्यासाठी 20 पदे मंजूर करण्यात आली.
दौंड येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासाठी व आवश्यक असणाऱ्या पदनिर्मितीसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. राहुल कुल यांनी सांगितले कि मागील आमच्या मागील सरकारच्या काळात याला मान्यता मिळाली होती मात्र त्यानंतर काही कारणांनी काम रखडलेल्या अवस्थेत होते.मात्र वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला आज मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली याचा आनंद साजरा करत दौंड तालुक्यातील वकील संघटनेने एकमेकांना पेढे भरवून सत्कार केला यापुढे तालुक्यातील नागरिकांना इतर कोठेही न जाता दौंड न्यायालयातच त्यांचे सर्व कामे पूर्ण होणार आहे यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगरसेवक नंदू पवार व वकील संघटनेच्या वकील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!