अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा (दौंड) कार्यकारिणी जाहीर नवनियुक्त दौंड तालुका अध्यक्ष नामदेव त्रिंबक होले ,तसेच महिला अध्यक्षपदी सौ.अपर्णा कैलास पंडित यांची नियुक्ती.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो नंबर :- 8446119158
दौंड – अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही एक देशव्यापी संघटना आहे. या संघटनेचा मूलमंत्र एकच आहे की भ्रष्टाचार मुक्त समाज,ज्या ज्या ठिकाणी ग्राहक राजाचे शोषण होईल त्या त्या ठिकाणी ही संघटना पूर्ण ताकतीने ग्राहकांच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले तसेच दौंड शहर अध्यक्षपदी गणेश मनोहर जगताप यांचे काम पाहता त्यांची फेरनिवड करण्यात आली.दौंड शहर महिला अध्यक्षपदी ललिता राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. भ्रष्टाचार मुक्त समाज ,ग्राहक कण्यासाठी येणाऱ्या कार्यकाळात संघटनेच्या माध्यमातून गाव तिथे ग्राहक पंचायत ही संकल्पना राबविण्याचे कामकाज तालुक्याच्या वतीने करण्यात येणार आहे कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले असता टेबलाखालून लाच दिल्याशिवाय कोणत्याही ग्राहकांचे काम होत नाही इथून पुढे ज्या ज्या ग्राहकांना अशा संकटांचा सामना करावा लागेल त्यावेळी ग्राहकांनी निसंकोचपणे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शी संपर्क साधावा नक्कीच त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय ग्राहक पंचायत करेल असे सांगितले गेले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे उद्दीष्ट, प्रत्येक तालुक्यातील गावात, महाराष्ट्रातील जिल्ह्यात , तसेच देशातील भ्रष्टाचार कायमचा बंद करणे व सर्वसामान्य जनतेला, ग्राहकांना न्याय मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्टे. हेच आमचे तत्व हाच आमचा आवाज हाच आमचा संकल्प शोषण मुक्त समाज.असा नारा दिला.