“साहेब, आम्ही माणुसकी जपणं, हाच धर्म जोपासतो”
अमळनेर च्या नागरिकांनी दिली ग्वाही.
अमळनेर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांच
अमळनेरकरांमधे सामाजिक स्वास्थ्यासाठी
वाढीस लागावे यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत.
शांतता कमिटी मिटींग तर कधी तरूणांमधे काॅर्नर मिटींगा.
आता त्यांनी आपल्या अधिकारी व अंमलदार यांच्या सोबत नागरिकांच्या व्यवसायठिकाणी व रहिवास ठिकाणी थेट भेटी घेत लोकांशी परिचय करत आहेत व अडचणी जाणून घेत आहेत.
नागरिकही त्यांना चांगल्या आदरातिथ्याने, उत्साहाने उत्तम प्रतिसाद देत आहे.
दगडी दरवाजा – पानखिडकी – वाडी चौक – कसाली DP – भोईवाडा असा रस्ता व गल्ली असून या दरम्यान हिंदू – मुस्लिम – हिंदू – मुस्लिम अशी लागून संलग्न मिश्र धर्मिय वस्ती, दुकाने आहेत.
तसेच या भागात मंदिर मस्जिद देखील काही अंतराने मिश्र आहेत.
एकमेकांतील दुराव्याच्या भावना दूर करण्यासाठी व सौहार्दपूर्ण वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी अमळनेर चे पोलीस, अधिकारी यांनी गल्लीतील काॅर्नर मिटींग,
या गल्लीतील लोकांसोबत त्यांच्या घरी बसून चर्चा करणे, स्थानिक दुकानांत भेट देणे असे नियोजन व उपक्रम सुरू केला आहे.
आवश्यकतेनुसार काही वेळा संकोच विरहित चर्चा होण्यासाठी साध्या वेषात देखील भेटी घेतल्या जात आहेत.
अनेक जणांनी साहेबांना प्रतिक्रिया दिली की,
“साहेब, आम्ही माणुसकी जपणं, हाच धर्म जोपासतो”
यात प्रामुख्याने API राकेशसिंह परदेशी PSI नरसिंह वाघ PSI अनिल भुसारे PSI अक्षदा इंगळे व HC संजय पाटील, चंद्रकांत पाटील, PN डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील, सिद्धांत सिसोदे, नम्रता जरे चालक सुनिल पाटील
अशांनी अतिशय उर्जायुक्त उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला आहे.