अहिल्यादेवी होळकर जन्मभूमी चौंडीत शासकीय जयंतीसाठी ५० लक्ष इतका निधी
आ.प्रा.राम शिंदे व आ.गोपिचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी गावात महाराष्ट्र शासनाच्या वतीने 31 मे 2023 रोजी शासकीय स्तरावर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे परिपत्रक उपसचिव धुरी यांनी जारी केले असुन जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि विधान परिषद सदस्य प्रा.श्री.राम शिंदे व श्री.गोपीचंद पडळकर यांच्या अनुक्रमे दिनांक ०३/०४/२०२३ व दिनांक ०४/०४/२०२३ च्या पत्रान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून निधी उपलब्ध करुन देणेबाबत विनंती केली आहे.सदर विनंतीच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ अंतर्गतच्या “इतर जिल्हा योजनेतून एक वेळची विशेष बाब म्हणून रुपये ५० लक्ष इतका निधी इतर योजनांच्या बचतीतून उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या कन्येचा लोककल्याणकारी कामामुळे जगभरात आदर्श घेतल्या जातो लष्करी सामर्थ्य असतांना देखील तलवारीचा आणि बळाचा वापर न करता सत्तावीस वर्षे माळव्याच्या होळकर राजगादीची धुरा सांभाळून संबंध भारतातील बारा ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, चार धामासह दहा हजार मंदिराचे निर्माण आणि जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे.देशातील हे मंदिरे भारतीय अस्मितेचे प्रतिके असून त्यांच्याकडे बघितल्यास अहिल्यादेवी
समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.अहिल्यादेवींच्या जन्माचा सोहळा सुखद व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रा.राम शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.