मुंबई: अखिल भारतीय धोबी महासंघा तर्फे मुंबईमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिरपूर येथील प्रा. डॉ. रजनी नकुल लुंगसे यांना (दि. १४ एप्रिल) रोजी राष्ट्रीय महिला रजक रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. प्रा. रजनी नकुल लुंगसे यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा तसेच समाज संघटनात्मक, समाज प्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुरस्कार अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, राष्ट्रीय नेते राजेंद्र शेठ आहेर यांचा हस्ते देण्यात आला आहे. यावेळी समाजसेवक प्रसिद्ध उद्योगपती आशिष कदम, समाज सेविका रेखाताई कदम, धुळे मनपा नगरसेवक सोनल शिंदे, कि. वि. प्रसारक संस्था खजिनदार आशाताई रंधे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, महिला प्रदेश कार्याध्यक्षा सुषमाताई अमृतकर, कार्याध्यक्ष, आरक्षण कृती समिती सचिव संतोष सवतीरकर, कोकण विभागिय अध्यक्ष बळवंत साळुंखे, ज्येष्ठ मार्गदर्शक राजाराम कनोजिया, अकलुजचे संतोष कारंडे आदि परिट समाजाचे मान्यवर उपस्थित होते. प्रा. डाॅ. रजनी लुंगसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.