July 1, 2025 1:06 pm

विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व पोस्को अॅक्ट 2012 यासंदर्भात श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे मार्गदर्शन कार्यक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व पोस्को अॅक्ट 2012 यासंदर्भात श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे मार्गदर्शन कार्यक्रम
दिवाणी न्यायाधीश आणि सदस्य सचिव,जिल्हा विधी प्राधिकरण चंद्रपुर मा.सुमित जोशी साहेब, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्रा. निलेश र. बेलखेडे यांची प्रमुख उपस्थिती

येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,चंद्रपुर द्वारा संचालित श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” CYBER CRIME & POCSO ACT” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ह्यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,चंद्रपुर चे उपाध्यक्ष मा.श्री.अभिषेक व्ही.येरगुडे सर,प्रमुख उपस्थिती व सत्कारमुर्ती मा.श्री.प्रा.निलेश बेलखेडे सर ( सिनेट सद्यस्य,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली ) प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून मा.श्री.सुमित जोशी साहेब ( दिवाणी न्यायाधीश आणि सदस्य सचिव,जिल्हा विधी प्राधिकरण चंद्रपुर ),मा.श्री.मुजावर अली सर ( सायबर गुन्हे विभाग,चंद्रपुर ) तसेच मा.श्रीमती सपना निरंजने मॅम ( सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच CWC सद्यस्य ), प्राचार्य राजेश पेशट्टीवार सर यांची प्रामुख्याने उपस्थित होते.


मा.सुमित जोशी साहेबांनी “POCSO ACT” ह्यावर उत्कृष्ट मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली,मा.मुजावर अली सरांनी “सायबर गुन्हे आणि खबरदारी” ह्याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले,मा.श्रीमती सपना निरंजने मॅम ह्यांनी महिला सुरक्षेवर उपयुक्त मार्गदर्शन केले तसेच चंद्रपूर जिल्हाचं युवा नेतृत्व सिनेट सदस्य मा.श्री.निलेश बेलखेडे ह्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही वाचविण्याचा दृष्टीने शालेय शिक्षणासोबतचं, सामाजिक जिवनात युवकांचे कर्तव्य ,त्यांच्या भुमिका काय असायला हव्यात या विषयावर मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमात नवनियुक्त सिनेट सद्यस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, व युवासेना विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य,प्रा. श्री निलेश बेलखेडे ह्यांचा संस्थेतर्फे शाल-श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री राजेश पेशट्टीवार,संचालन श्री प्रवीण लांजेवार आणि आभार प्रदर्शन कु.वर्षा गावंडे ह्यांनी केले.
कार्यक्रमास सर्व निदेशक आणि कर्मचारी वर्ग तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!