इंदापूर पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच… चक्क 18 लाख रुपयांचा गुटखा जप्त.
निरा नरसिंहपुर: दिनांक:31, प्रतिनिधी:डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
अकलूज इंदापूर राज्य रस्त्यावरून पुण्याला निघालेल्या 18 लाख 8 हजार 800 रुपयांचा गुटखा मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी पकडला. यामध्ये दोघांना अटक करण्यात आलेली आहे.
प्रकाश कुशल हेगडे( वय 26 वर्ष, रा. कोकटनूर ता.अथणी जि. बेळगाव. मल्लू जयश्री मेलगडे( वय 18 वर्ष, रा. अर्जुनगी,ता. बबलेश्वर, जि. विजापूर अशी आरोपींची नावे आहेत या प्रकरणात वापरण्यात आलेली सहा लाख रुपयांची पिकअप गाडी असा 24 लाख आठ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाजवळ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार बालगुडे व पोलीस शिपाई राखुंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूज ते इंदापूर राज्य मार्गावरून गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या पथकाने दिनांक 29 मार्च रात्री नऊ वाजेच्या सुमारास बावडा ते इंदापूर राज्य मार्गावर सापळा रचला दरम्यानच्या काळात एक संशयित पिकप क्रमांक एम एच 13 डी क्यू 24 96 येताना दिसली. त्याला थांबवून त्याच्यामध्ये गुटखा आढळून आला. गाडी चालक व त्याच्या साथीदाराला अटक करून मुद्देमाला मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील अधिक तपास करीत आहेत.