पोलीस उपनिरीक्षक पदी श्री रतिलाल चौधर यांची नियुक्ती; कष्ट जिद्द चिकाटी याच्यावर मिळालेली पोचपावती
(निलेश गायकवाड )
वालचंद नगर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असणारे श्री रतिलाल चौधर यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याची वरिष्ठांकडून जाहीर करण्यात आले .
रतिलाल चौधर यांनी तंटामुक्ती ग्राम सुरक्षा दल तसेच महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपक्रम राबविण्यात आले . सर्वसामान्य गोरगरीब व्यापारी शेतकरी चे अडीअडचणी प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी त्यांची ओळख संबोधली जात असत. अधिकारी नसून एक आपला जवळचा माणूस अशा सर्वसामान्यांच्या मनात दिसून येत असे. याच प्रामाणिक प्रयत्नातून त्यांना मिळालेले हे यश व मिळालेली बढती हीच त्याची पोचपावती असावी असे म्हणावे लागेल.
चौधर यांनी भिगवन येथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या सत्कार प्रसंगी पोलीस खात्यातील वाटचालीचा खडतर प्रवास सर्वांशी दिलखुलास सांगितला . तसेच पोलीस खात्यांमधील वरिष्ठांकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व साथ या जोरावरती हे यश मिळाल्याचे बोलताना सांगितले. भिगवण येथील सत्कार प्रसंगी यावेळी अमित देवकाते, अरविंद देवकाते,जाफार मुलाणी, नवनाथ धुमाळ, सलिम इनामदार, समिर नालबंद, पत्रकार निलेश गायकवाड पत्रकार संजय शिंदे हे उपस्थित होते.