July 1, 2025 1:17 pm

महिलांना एक दिवसा साठी शुभेच्छा नको तर दररोज सम्मानाने वागवा – सौ निलीमा पुंडे

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- जागतिक महिला दिना निमित्त सौ निलीमा पुंडे म्हणाल्या की, महिलांना एक दिवसा साठी शुभेच्छा नको तर दररोज सम्मानाने वागवल्यास खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.

     महिला दिना निमित्त ” मैत्रिणी ग्रुप ” किल्ला विभाग करमाळा ” यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान येथील निराधार महिलांना लाडू चे वाटप करण्यात आले व त्यांचा महिला दिन गोड करण्यात आला.

   पुढे बोलताना पुंडे म्हणाल्या की, श्रीराम प्रतिष्ठान चे कार्य हे प्रशंसनीय तर आहेच पण प्रेरणादायी सुद्धा आहे. त्यांच्या या पुण्य कार्यात मैत्रिणी ग्रुप चा खारीचा वाटा म्हणून आजचे हे छोटेसे कार्य केले आहे. श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने फक्त निराधारांना अन्नदानच नव्हे तर  गेल्या महिन्यात २१ जोडप्यांचे सामुदायिक विवाह खूप थाटात संपन्न केला . त्यांच्या कार्याला आमच्या ग्रुपच्या वतीने वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .

यावेळी मैत्रिणी ग्रुप मधील सौ निलीमा पुंडे, सौ . कोमल ठेंगडे, सौ . सरोजिनी पाटील, सौ . सुजाता मनसुके, सौ . कल्पना जगताप, सौ . पुजा मनसुके, सौ . वैशाली कराड, सौ शैलजा मेहेर, सौ . रेखा वीर, सौ अनिता चोरगे, सौ . वैशाली रंदवे, सौ . संगीता मुसळे, सौ . अर्चना पानसांडे,  उपस्थित होत्या

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!