करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- दरवर्षी करमाळा मेडिकोज गिल्ड तालुकास्तरीय वैद्यकीय संघटना महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी उपक्रम आयोजित करत असते.
त्याच प्रमाणे यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 12 मार्च 2023 वार रविवार रोजी अठरा वर्षांवरील सर्व महिलांसाठी मांगी एमआयडीसी अंतर्गत रस्ता येथे ” पिंकथोन “या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अबला नव्हे… सबला नारी… सशक्त नारी… आरोग्य दक्ष नारी… हे ब्रीद घेऊन सकाळी सहा वाजता आयोजन केले आहेअ अशी माहिती यावर्षीच्या संघटनेच्या लेडीज विंग च्या अध्यक्ष डॉ सौ चेतना शिंदे यांनी दिली.
तरी यासाठी जास्तीत जास्त महिलांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष सौ डॉ वर्षा करंजकर, उपाध्यक्ष डॉ प्राजक्ता पाठक, व आयोजक सौ डॉ मनीषा माळवदकर यांनी केली आहे.
या स्पर्धेत सर्व सहभागी सदस्यांना टीशर्ट व मेडल देण्यात येणार आहे तर प्रथम तीन विजेते व दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना करमाळा मेडिकोज गिल्ड संघटनेतर्फे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष डॉ यशवंत व्हरे यांनी सांगितले
या स्पर्धेसाठी प्रायोजक आहेत ज्योतीचंद भाईचंद सराफ व दिगंबररावजी बागल पेट्रोल पंप अशी माहिती उपाध्यक्ष डॉ सुहास कुलकर्णी व आयोजक डॉ हर्षवर्धन माळवदकर यांनी दिली.