June 30, 2025 1:20 am

बारामती भिगवण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे,चाललेल्या कामाचा दर्जा सुधारावा:अखिल भारतीय मराठा महासंघ

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती भिगवण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे,चाललेल्या कामाचा दर्जा सुधारावा:अखिल भारतीय मराठा महासंघ

(निलेश गायकवाड)

भिगवण – बारामती भिगवण रस्त्याचे काम चालू झालेले असून रस्त्याच्या कामामध्ये अतिशय निकृष्ट पद्धतीने काम चाललेले असून सदर कामांमध्ये अक्षरशा मुरूम टाकण्याच्या ऐवजी बहुतांश ठिकाणी माती टाकून तसेच काही ठिकाणीच उकरून मुरमाच्या ऐवजी माती वापरली जात असल्याने अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष कायदेतज्ञ पांडुरंग जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन तसेच योग्यत्या गुणात्मक सुधारणा न झाल्यास जनआंदोलन उभारले जाईल अश्या प्रकारच्या सूचना निवेदनाद्वारे देण्यात आल्या.

तसेच कामाबाबत आवश्यक त्या ठिकाणी काम चालू असले बाबत बोर्ड लिहिलेले नाहीत तसेच सदर कामांमध्ये अनेक ठिकाणी उकरून ठेवल्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असतानाही सदर ठिकाणीही कोणत्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही अश्या प्रकारचे दिसत आहे.भविष्यकाळामध्ये सदर कामाच्या परिसरात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता
येणार नाही.त्यामुळे सदर कामाचे ठेकेदार यांना कामाचा दर्जा सुधारणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन कार्यालयातून लेखी समज देणे अत्यंत आवश्यक आहे.

रस्त्याच्या या होत असलेला निकृष्ट कामामुळे एका वर्षातच हा रस्ता उकळून बाहेर पडेल याची भीती वाटत आहे.. शासन दरवर्षी ग्रामीण भागातील रस्ते सुदृष्ट व्हावे यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी दिला जाते मात्र या निधीचा मातीमध्ये उपयोग करताना दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा सुरू असल्याचे चित्र आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!