July 1, 2025 9:56 am

विदर्भ राज्य विदर्भातील तरुणांच्या हातात देणार माजी आमदार ऍड वामनराव चटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

विदर्भ राज्य विदर्भातील तरुणांच्या हातात देणार
माजी आमदार ऍड वामनराव चटप

दिनांक ०२/०३/२०२३ ला संध्याकाळी ६ वाजता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथुन विदर्भवादी शेतकरी नेते माजी आमदार ऍड वामनराव चटप यांच्या नेतृत्वात निघालेली विदर्भ निर्माण यात्रा उमरेड शहरात दाखल झाली…..
संध्याकाळी ७.३० वाजता भिसी चौक येथे कॉर्नर सभेचे आयोजित करण्यात आली होती या सभेला मार्गदर्शन करताना ओसाड गावांचा अशांत प्रदेश विदर्भ या पुस्तकाचे लेखक प्रा.प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विकासाचा तुलनात्मक विकास यावर प्रकाश टाकुन गेल्या ६२ वर्षात महाराष्ट्रात विदर्भावर झालेल्या अन्यायाचा लेखाजोखा मांडला तर ऍड. वामनराव चटप यांनी कॉग्रेस व भाजपाने विदर्भातील जनतेच्या जनमताचा विश्वासघात केला असुन हे दोन्हीही पक्ष विदर्भ द्रोही पक्ष असल्याची टिका केली आणि ११८ वर्षांचं विदर्भ आंदोलन ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत संपवुन विदर्भातील तरुणांच्या हातात देणार असल्याचे सांगितले…
या सभेला १९५७ पासुन सक्रिय असलेले चिंतले गुरुजी, शहरातील प्रतिष्ठित व्यवसायी विकास सिर्सिकर,विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे प्रदेश सहसचिव सचिन डाफे, शेतकरी संघटना वर्धा जिल्हा जेष्ठ कार्यकर्ते दत्ताजी राऊत, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली विभाग प्रमुख पंकज साबळे,मंसुरभाई, वाशिमचे प्रकाश चिखलीकर ,सागर सोनकुसरे सोशल मिडिया अध्यक्ष उमरेड शहर,रुपेश देवीकर सोशल मीडिया उपाध्यक्ष मयूर देवघरे , रवी पौनीकर, दुमदेव देवीकर, कुंदन सहरकर, हितेश पराते, आशिष आमगावकर व विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते…….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!