विजय कसब्यात जल्लोष दौंड मध्ये
रविंद्र धंगेकर यांनी पुण्यात (कसबा)विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याचा आनंद दौंड मध्ये पेढे वाटून फटाके वाजवून साजरा
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. नं.8446119158
दौंड – महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपला धोबीपछाड करत दणदणीत विजय मिळवला दौंड तालुक्याचे सुपुत्र असलेले रवींद्र धंगेकर यांचा विजय दौंड मधील छ.शिवाजी महाराज चौकात जल्लोषात साजरा करण्यात आला,यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येत पेढे वाटून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी दौंड शहर काँग्रेस अध्यक्ष हरेश ओझा,पुणे जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष तन्मय पवार,विठ्ठल शिपलकर, ठाकरे गट शिवसेनेचे गणेश दळवी कैलास शहा,विवेक संसारे,आहेर,संजय परकाळे ,अतुल जगदाळे,श्रेयस मुनोत व इतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.