July 1, 2025 4:53 am

परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…
राज्यात असं वारंवार घडतयच कसं, सरकार काय झोपलय का ?

बारावीच्या पेपरफुटी प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले

बारामती (सह-संपादक – संदिप आढाव)

मुंबई, दि. 3 :- बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा… पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायच कसे, सरकार काय झोपलय का ? असा संपप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले. अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून या मागे कोणत रॅकेट कार्यरत आहे का ? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे. बारावीची परिक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!