डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दौंड पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम पार
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. नं.- 8446119158
दौंड – दिनांक 1/3/2023 रोजी महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्राप्त, डॉ.नाना साहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान ,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व संवर्धन, विहीर जलपुनर्भरण इ.कामे प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येतात.त्याच धर्तीवर
खडकवासला पाटबंधारे उपविभाग क्र. 1 दौंड कार्यालयाच्या आवारातील
दौंड शहरातील पाटबंधारे विभागाचा परिसर, कर्मचारी निवास कार्यालय संपूर्ण रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग,पालापाचोळा डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 152 सदस्यानी निस्वार्थीपणे हातात खराटा,फावडे, घमेले, एक जे.सी.बी.तिन ट्रॅक्टर च्या मदतीने सकाळी सात वाजल्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली साधारण पणे 25 टन कचरा गोळा करण्यात आल्याचे सांगीतले. 2 ते 3 तासात स्वच्छता मोहीम यशस्वी पणे राबवून संपविण्यात आली.