चिमणपुरी पिंपळे येथे भव्य दिव्य चमत्कारी श्री शनि महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठान कळस सोहळा प .पू . संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते संपन्न
अमळनेर:-चिमणपुरी पिंपळे येथे भव्य दिव्य चमत्कारी श्री शनि महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठान कळस सोहळा प .पू . संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते संपन्न.
अमळनेर तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे दिनांक 02/03/2023 व 03/03/2023 रोजी भव्य दिव्य चमत्कारी श्री शनी महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठान सोहळा आचार्य पद श्री दीपेश गुरुजी व सहकारी नाशिक यांच्या हस्ते होणार आहे व शिखरकलश
चा कार्यक्रम परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते संपन्न होत आहे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 46 फूट उंच असलेले प्रशस्त सभा मंडप तसेच परिसरातील कंपाउंड व बाल उद्यान करण्याचे शनी मंदिर समितीने ठरविले आहे.
गुरुवार दिनांक 02/03/2023 रोजी सकाळी 7 वाजेला मुर्ती शोभा यात्रा व पूजेस प्रारंभ , शंतीसुक्त पठण ,प्रायश्चीत संकल्प , प्रधान संकल्प ,गणपती पूजन , पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, ब्राह्मण वर्णन, कुटीर होम,मूर्ती जलाधिवास,मंडप प्रवेश, वास्तुमंडल स्थापन, योगिनी मंडल स्थापन, क्षेत्रपाल मंडल स्थापन , भद्र मंडल स्थापन अरणी मंथन, नवग्रह व रुद्र वरून स्थापन, मंदिरासाठी मूर्ती पालघर सहाय्यक कामगार आयुक्त पालघर ( पिंपळे खुर्द) श्री विजय निंबा चौधरी यांनी यांनी आणून दिली आहे तसेच मुख्य कार्यक्रम 03।3।2023 सकाळी आठ वाजता होम हवन विधी पूर्वहूती देऊन चमत्कारी श्री शनी मंदिरात श्री शनि महाराज विराजमान होतील त्यानंतर सकाळी 11 वाजेपासून तीन वाजेपर्यंत भोजन प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे चिमनपुरी पिंपळे येथील ग्रामस्थांनी विनंती केले आहे.