June 29, 2025 10:39 pm

शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दौंड पोलीस स्टेशन कडून रॅपिड ऍक्शन फोर्स रूट मार्च काढण्यात आला.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दौंड पोलीस स्टेशन कडून रॅपिड ऍक्शन फोर्स रूट मार्च काढण्यात आला.
प्रतिनिधी- विकी ओहोळ
मो नं. – 8446119158
दौंड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आणि सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील लोकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दौंड शहरातील अवैध धंदे, दारु, मटका, जुगार, चोरी, दरोडा, घरफोडी, लुटमारी,खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार तसेच अनैतिक संबंधातून अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे दौंड पोलीस स्टेशन च्या दैनंदिन रेकॉर्ड वही मध्ये दिसून येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका घेऊन दौंड पोलीस स्टेशन येथिल ४ पोलीस अधिकारी तसेच २५ पोलीस हवालदार यांच्यासह दौंड शहरातील संविधान चौक, हुतात्मा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,खाटिक गल्ली, गांधी चौक, विठ्ठल मंदिर, आलमगीर मस्जित, कुंभार गल्ली, शिवाजी चौक, दौंड पोलीस स्टेशन, या भागातील नागरिकांना दिलासा मिळावा व वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून या दृष्टिकोनातून रॅपिड ऍक्शन फोर्स काढण्यात आला होता, त्यामुळे दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दौंड पोलीस स्टेशन ॲक्शन रूट मार्च काढण्यात आला होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!