July 1, 2025 8:02 am

अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमन पदी भागवत पाटील तर व्हाईस चेअरमन पदी भिका धनगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमन पदी भागवत पाटील तर व्हाईस चेअरमन पदी भिका धनगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

अमळनेर-अमळनेर तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांची सहकारी संस्था असलेल्या तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया तालुका सह निबंधक तथा अध्यासी अधिकारी एस पी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ८फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वाजता राबविण्यात आली , त्यात अमळनेर व पारोळा तालुक्यातील १५ संचालक मधून पाडळसरे येथील प्रगतिशील शेतकरी तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पंडित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी निम येथील भिका हिरामण धनगर याचा एकेकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने चेअरमनपदी भागवत पंडित पाटील व व्हाईस चेअरमनपदी भिका हिरामण धनगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केली , यावे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील (फाफोरेकर ), माजी व्हाईस चेअरमन सुशीलकुमार पाटील (निम ), माजी चेअरमन शामकांत पाटील (गोवर्धन ),संचालक युवराज आत्माराम पाटील (बोहरे) ,अरुण श्रीराम पाटील (कन्हेरे) ,भागवत पंडित पाटील (पाडळसरे),प्रताप आत्माराम पाटील (फाफोरे) ,अनिल भीमराव पाटील (बोहरे ),कुलदीप कृष्णा पाटील (कंडारी) ,हिलाल छन्नू सैदाने (निम) ,भिका हिरामण धनगर (निम ),मंगलाबाई शिवाजी पाटील (बोहरे ), सुवर्णा अनिल पाटील ( बोहरे ) ,तज्ञ संचालक सुनील कान्हैयालाल काटे (कोळपिंप्री), आमंत्रित संचालक संदीप लोटन चौधरी( निम ) हे संचालक या बैठकीला उपस्थित होते , यात सूचक म्हणून शामकांत पाटील यांनी तर अनुमोदन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

या निवडीबद्दल नवनिर्वाचित चेअरमन भागवत पाटील व व्हाईस चेअरमन भिका धनगर यांचे अमळनेर तालुक्यातुन आमदार अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागिय कार्याध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील ,विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील ,व्हाईस चेअरमन शत्रुघ्न पाटील ,राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील ,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील ,संदीप पाटील , पाडळसरेचे माजी सरपंच रमेश पाटील , माजी उपसरपंच रवींद्र पाटील ,पंडित पाटील , ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे गोपाल कोळी यांनी विशेष अभिनंदन केले आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!