पोलीस अधीक्षकांनी केला अमळनेर पोलिस निरीक्षक विजय शिंदेसह टीमचा गौरव
अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतेलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांनी अवघ्या दीड महीन्यांत गुन्हेगारांवर अतिशय कडक कारवाई करून अमळनेर पोलीसांची सिंगम वृत्ती दाखवून दिली आहे. यामुळे अमळनेर करांचा पोलीसांप्रतीचा विश्वास व प्रेम दृढ झाले आहे.
अमळनेर च्या जनतेकडून त्यांची प्रशंसा होत आहे.
याची दखल जळगाव जिल्हा पोलीस दलाने देखील घेतली असून जळगाव जिल्हा पोलिस प्रमुख पोलीस अधीक्षक माननीय श्री. एम राजकुमार यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी केलेल्या MPDA च्या कारवाई बाबत त्यांचा त्यांच्या टिमसह प्रशंसापत्र देवून गौरव केला आहे.
यात अमळनेर चे पोलीस हेड काॅन्स्टेबल किशोर पाटील, रविंद्र पाटील, दिपक माळी, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे यांचाही मा.पोलीस अधीक्षक यांनी प्रशस्तिपत्रक देवून गौरव केला आहे.