June 30, 2025 12:14 pm

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये गणेशवाडी शाळेने मिळवला दुसरा नंबर

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये गणेशवाडी शाळेने मिळवला दुसरा नंबर
” वीर जवान तुझे सलाम नाटिका अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक “
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत.जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये गणेशवाडी तालुका कर्जत येथील प्राथमिक शाळेच्या मोठ्या गटाने सादर केलेल्या ‘वीर जवान तुझे सलाम’ या नाटिकेने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. सैन्य दलातील जवानांच्या जीवनावर आधारीत अनेक ठळक प्रसंग नाटीकेतून सादर करण्यात आले. यामधील सैन्य दलाच्या प्रशिक्षणातील विविध कसरती ,कौटुंबिक प्रसंग, सैन्य दलातील शिस्त ,युद्धाचे प्रसंग ,शहीद जवानाला वाहिलेली श्रद्धांजली असे अनेक प्रसंग हुबेहुब व प्रभावीरित्या विद्यार्थ्यांनी सादर केले त्यामुळे परीक्षकांसह उपस्थित जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मा. भास्कर पाटील शिक्षण विस्ताराधिकारी रविंद्र कापरे , कांतीलाल ढवळे, अभयकुमार वाव्हळ,अलीम शेख, श्रीम. धर्माधिकारी, श्रीम. निर्मला साठे,श्रीम. मनिषा कुलट यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद दिली.

नाटिकेतील जवानांनी सादर केलेले प्रशिक्षणाचे व युद्धाचे प्रसंग पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांची मनमुरात साथ दिली

गणेशवाडी शाळेची विद्यार्थिनी प्रिया बापू ढवारे हिने सादर केलेली ‘ जलवा जलवा ‘व ‘दिल दिया है जान भी देंगे’ या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. सदर गीतांना उत्कृष्ट संगीत दिग्दर्शन सहशिक्षक आयुब खान यांनी केले.

गणेशवाडी शाळेतील एकूण 20 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर कर्जत तालुक्याचे नेतृत्व केले. शाळेच्या या यशाबद्दल कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव , गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे ,शिक्षण विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड, देवराम लगड यांनी शाळेचे अभिनंदन केले .

शाळेच्या या यशाचे सरपंच सौ. कल्पना विलास कायगुडे व सर्व ग्रा. पं.सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष श्रीराम व सर्व सदस्य यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळा मुख्याध्यापक राजू भोईटे , सहशिक्षक चंद्रकांत गावडे, दत्तात्रय शेटे ,गहिनीनाथ शिंदे, मीनाताई कोकरे, सुनील गोरे ,आमीन बिरादार यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!