June 30, 2025 6:49 pm

वाटलूज ग्रामपंचायत च्या वतीने अनोखा उपक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन शिक्षणात गुणवंत मुलींच्या हस्ते

अपनी भाषा में पढ़े! Translate

वाटलूज ग्रामपंचायत च्या वतीने अनोखा उपक्रम प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन शिक्षणात गुणवंत मुलींच्या हस्ते

(हर्षदा दशरथ गायकवाड हस्ते ध्वजवंदन)

वाटलूज :तालुका दौंड जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालय समोरील झेंडावंदन दहावी व बारावी इयत्ता मध्ये पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

सरपंच युवराज शेंडगे आणि सर्व सदस्य यांनी एक मते निर्णय घेऊन दहावी इयत्ता मधील हर्षदा दशरथ गायकवाड हिने ग्रामपंचायत कार्यालयासमोरील झेंडावंदन केले तर बारावीतील तेजश्री सतीश शेंडगे ऋतुजा धूळदेव शेंडगे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेसमोरील झेंडावंदन करण्यात आले.

या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक केले जात आहे. या उपक्रमामुळे मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होऊन आपल्या संधी मिळू शकते या आशेने विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतील.

यावेळी विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून शालेय स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पुण्यात आल्या.

यावेळी ग्रामस्थ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!