July 1, 2025 4:56 am

सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…!!

अपनी भाषा में पढ़े! Translate

सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…!!

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

आज सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशअध्यक्ष उद्योजक नागेश दादा फाटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,प्रसंगी वाखरीचे जेष्ठ पालक लक्ष्मण गायकवाड,खेड भाळवणी चे माजी सैनिक गजेंद्र पवार,होळे गावचे उद्योजक शिवाजी होटे,भंडीशेगावचे विलास सुरवसे,किर्तीकुमार गायकवाड,संतोष नागटिळक,शहाजी पाटील, ऍड. किरण घोडके,शेळवे गावचे मा.उपसरपंच तुकाराम गाजरे,विठ्ठल गाजरे,अरविंद लोकरे,समाधानभैय्या गाजरे ई. मान्यवर उपस्थित होते.
सुप्रसिद्ध उद्योजक नागेश दादा फाटे यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेची शिस्त,भौतिक सुविधा व गुणवत्तेविषयी गौरवोद्गार काढले, तसेच प्रशालेत राबवण्यात येणारे नवोपक्रम,स्पर्धापरीक्षा,वक्तृत्व,कला, क्रीडा ई.सर्व भरमसाठ फी घेऊन एखाद्या आंतरराष्ट्रीय शाळेत देण्यात येणाऱ्या सुविधा या ग्रामिण भागातील तरुणांनी उभी केलेली एक स्वयंअर्थ सहाय्यीत शाळा देत आहे, तेही अत्यल्प फी घेऊन, ही विशेषतः कौतुकास्पद बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली…; विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थापकांच्या तळमळीसह अध्यापक वृंदाचे होणारे भरगोस प्रयत्न याबद्दल परिवाराचे कौतुक केले,सदर प्रशाला जरी ग्रामिण भागात असली तरीही पंढरपूर,वाखरी सारख्या शहरी भागातून व आसपासच्या १५ गावातून मुलं या शाळेत येतात ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी म्हटले,अशा या प्रशालेस भरघोस मदत करण्याची ग्वाही या प्रसंगी उद्योजक नागेश दादा फाटे यांनी दिली.
वाखरी गावचे जेष्ट पालक लक्ष्मण गायकवाड यांनीही प्रशालेतील व्यवस्थितपणा,व विध्यार्थी घडवण्यासाठीची धडपड पाहता आपले वडील कै.भानुदास गायकवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रशालेच्या नावाने दहा हजार रुपयांची कायमस्वरूपी ठेव देऊन दरवर्षी त्याच्या येणाऱ्या व्याजातून ई ५वी व ई ८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या विध्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचे जाहीर केले,व रोख दहा हजार रुपये प्रशालेकडे सुपूर्द केले..!!
ऍड.किरण घोडके यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेच्या एकूण गुणवत्तेचे कौतुक केले, तसेच विध्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका काय असावी याबद्दल मार्गदर्शन केले..
पालकांच्या वतीने श्री.सागर गोडसे यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेच्या प्रगतीविषयी चांगले मत व्यक्त केले,तसेच समाधान भैय्या गाजरे यांनी आपल्या मनोगतातून सणराईज परिवारास ऊर्जा दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रशालेत विध्यार्थ्यांची भाषणे, गाणी,संचालन,कवायत,व इतर ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी केले, कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले व सूत्रसंचालन मोहन गायकवाड यांनी केले,कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व सनराईज परिवाराने अथक परिश्रम घेतले…*l
पालक, जेष्ट-श्रेष्ट नागरिक व मित्रपरिवार यांनी आणलेल्या खाऊ चे विध्यार्थ्यांमध्ये वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…!!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!