वकीलांवर पोलीस झाले भारी
दौंडकरांना पोलीस अन् वकिलांचा सामना पाहायला मिळाला क्रिकेट च्या मैदानी
दौंड पोलीस क्रिकेट टीम ची दमदार कामगिरी
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त दौंड तालुका वकील बार असोसिएशन यांचे वतीने दौंड कला वाणिज्य कॉलेज येथे क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते. त्यामध्ये पोलीस आणि वकील यांचे एकुण 8 संघ सहभागी झालेले होते.
यामधे पीआय भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने व महेंद्र गायकवाड यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली दौंड पोलीस स्टेशनच्या संघाने उत्कृष्ट खेळ करीत दौंड वकील संघाला फायनलमध्ये हारवून विजेते पद पटकावले. त्यामध्ये रोख रक्कम व बक्षीस मा. न्यायाधीश एस. डी. काळदाते यांचे हस्ते देऊन ” ऑल राऊंडर इन द सिरीज ” ने सन्मानित केले.
या वेळी एक दिवस स्वतः साठी सामना जिंकल्याचा व विजयाचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.या स्पर्धेकरिता दौंड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव तसेच न्यायालयातील मुख्य न्यायाधीश मा.गोयल खेडकर मॅडम, काळदाते सौ. मुक्कांवर मॅडम, मोर , सौ. कुलकर्णी, व न्यायालयीन कर्मचारी इत्यादी अधिकारी व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.