महावितरणच्या खासगीकरनाला वीज कर्मचाऱ्यांचा विरोध 72 तास राहणार संप सुरू
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – वीज मंडळातील होत असणाऱ्या खाजगीकरनाला विरोध तसेच( खासगी) अदानी इलेक्ट्रिक कंपनीला वीज वितरण परवानगी देऊन महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेची सेवा करणारी महावितरण कंपनी मातीमोल होऊ नये यासाठी आजपासून रात्री 00..00 पासून 72 तासांचा लक्षणिक संप वीज मंडळातील सर्व च्या सर्व 30 संघटनानी पुकारला आहे. या काळात आपणास कदाचित वीज खंडित होण्याचा प्रकार होऊ शकतो. झाल्यास माफी असावी. परंतु ही जनतेची कंपनी वाचली पाहिजे हा एकच उद्देश आहे. आपला पाठिंबा हवा म्हणून आपणास या अगोदर विनंती केली आहे व आपला पाठिंबा मागत आहोत असे दौडं MSEB कार्यालयाचे म्हणने आहे शासनाने याची दखल न घेतल्यास पुन्हा 18 जानेवारी पासून बेमुदत संप होइल.जोपर्यंत शासन यात हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत हा लढा चालु राहील तरी सहकार्य करावे ही विनंती
सहाय्यक अभियंता, महावितरण, दौंड शहर यांनी केली.