बर्गेवाडीत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके कृषीकन्यांनी केले सादर
प्राचार्य एस. पी. गायकवाड व प्रा.शेंडे यांनी विद्यार्थिनींना केले मार्गदर्शन .
प्रतिनिधी संदीप कायगुडे
कर्जत:महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बर्गेवाडी तालुका कर्जत येथे शेतकऱ्यांना गहू बिजावर बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवले. रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू पिकाची लागवड करतात .गहू पीक लागवडी पूर्वी गव्हाच्या बिजावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. गव्हाच्या बीजावर प्रथम रासायनिक व नंतर जैविक अशा पद्धतीने दोन्ही बिज प्रक्रिया कृषी कन्यांमार्फत करण्यात आली .आधी रासायनिक बीज प्रक्रिया करून दाखवत ती का व कशी गरजेची आहे हे कृषी करण्याचे गरजेचे आहे हे कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यानंतर जैविक प्रक्रियेचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले .रासायनिक व जैविक प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण याविषयी विद्यार्थिनींनी माहिती दिली .रासायनिक प्रक्रियेसाठी थायरम चे एकरी प्रमाण व गुळ पाण्याचे प्रमाण किती असावे हे सांगून मग जैविक प्रक्रियेसाठी लागणारा ऍझोटोबॅक्टर त्याच बरोबर सेंद्रिय गुळ यांचे एकरी प्रमाण घेऊन बीजावर प्रक्रिया कशी करावी याची माहिती शेतकऱ्यांना दिली .बीज प्रक्रिया केल्याने नंतर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो व उत्तम अंकुरण फुटण्यास मदत होते .याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कृषी कन्या भारती मिसाळ, मोहिनी ठुबे ,आदिती जाधव ,अंजली दहातोंडे ,रवालिका कल्याणपु ,श्रीजा रेड्डी यांनी प्रात्यक्षिकाचे नियोजन केले होते .महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी. गायकवाड व कृषी शास्त्र विभागातील तज्ञ प्राध्यापक शेंडे सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.