बारामती कृषिदुतांचे लोणी मासदपूर येथे वृषरोपणाची मोहीम
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत :- तालुक्यातील लोणी मासदपुर येथे डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती कृषी दूत पंकज वाघ , प्रसाद ससाणे, तेजस सोळंके, विशाल बागुल,सुनील सनक्के , अजित राजपूत , रोहित रामटेके , साई तेजा पाबत्ती ,माधव रेड्डी यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत गावातील महाविद्यालयात वृक्ष रोपनाचे महत्व स्पष्ट करून गावकऱ्यांना सांगितले.त्याबरोबर गाव मध्ये वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करत महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण सुद्धा केले.
यामध्ये महाविद्यालयाचे मुख्याध्यापक काकडे सर , सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत व सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
बीज प्रक्रिया , औषध फवारणी कांदा पीक लागवड व काळजी,ऊस रोप लागण, डाळिंब पीक व त्याबरोबर घेण्याची योग्य ती काळजी शासकिय वेगवेगळ्या योजना व कार्यक्रम या लोणी मासादपूर गावांमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असे वेगवेगळे उपक्रम आम्ही ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत घेणार आहोत . अशी यावेळी डॉक्टर शरद चंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती या ठिकाणाहून आलेल्या कृषी दुतानी वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले.