घ्याचीच असेल तर घ्या विषाची परीक्षा !
गद्दारांना खुले आव्हान !!
माझी लेखणी धारदार आहे.ती सद् रक्षणाय व खलं निग्रहणाय या वृत्तीने गेली ४३ वर्षे वाटचाल करीत आहे. ती दुर्जनांवर प्रहार करताना सज्जनांचा व अन्यायग्रस्तांचा सन्मान व न्यायनिवाडा करीत असते.
माझ्या सातत्यपूर्ण “निष्ठावंत समर्थक लेखनामुळे व गद्दारांचे वाभाडे काढणा-या झणझणीत लेखनामुळे” काही हितसंबंधित भ्रष्ट व बदमाष बिथरले आहेत. काल त्यांनी माझ्या विरोधात पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. वास्तविक मी घटनेने दिलेल्या लेखन,वाचन व विचार स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार लेखन करीत असतो.त्यामुळे तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकत नाही.
बदमाश, भ्रष्टाचारा विरोधात व अन्याया विरोधात माझी लेखनशैली ही ठाकरी भाषा सदृश्य असते. तर इतर प्रसंगी सोज्वळ प्रचलित भाषेत असते. मला वज्राहून कठीण होता येते तसेच मेणाहून ही मऊ होता येते.
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास
कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी देऊ गांडीची लंगोटी
नाठाळाच्या काठी देऊ माथा
माय बापाहूनी बहु मायावत
करू घातपात शत्रूहूनी !!
अशी राष्ट्र संत तुकोबांचीच शिकवण आहे,मी त्याचेच अनुकरण करीत आहे, सज्जन दुर्बल अन्याय-
पिडीतांसाठी मी मेणाहून मऊ होतो हे माझ्या सामाजिक कार्यावरून दिसून येते; तर बदनाम,बदमाश,भ्रष्ट लोकांविरोधात मी कठीण वज्रासमान होत असतो. भल्यांसाठी आम्ही भले आहोत,त्यासाठी आम्ही आमची लंगोटही सोडून देऊ पण नाठाळ लोकांच्या माथी काठी हाणण्यासही मागेपुढे पाहत नाही. मी माय बापासम जितका मायाळू आहे तितकाच दुष्टप्रवृत्तीच्या लोकांसाठी घातकी शत्रूपेक्षा भयंकर आहे. म्हणुनच लोक म्हणतात मित्र असावा तर दिलीप मालवणकर सारखा परंतू त्याच्याशी शत्रूत्व पत्करले तर तो तुम्हाला गाडेपर्यंत लढतच राहतो.
अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गरजू व निराधार लोकांना मदतीचा हात देत असताना लेंडिबाजांना अस्मान दाखवताना कुठेच कृपणपणा केला नाही, युवराज भदाणे सारख्यांना बरबाद करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावतो. निष्ठावंतांना प्राणपणाने साथ देत आहे तर गद्दारांविरोधात शिर तळहातावर घेऊन लढत आहे. रमेश चव्हाण सारखा उंदिर माझ्या नादी लागला तर त्याची काय गत होईल ते दिसेलच. मी कायदा मानणारा न्यायप्रिय भारतीय नागरीक आहे. त्यामुळे खोट्या केसेस करण्याच्या नाद कोणी करू नये.
१९८७ ला एका शिक्षण महर्षीने ती चुक केली होती ती त्याला किती महागात पडली हे रमेश चव्हाणला ठाऊक आहे.जेंव्हा शालेय पोषण आहारात लेंडी टाकण्याचा घृणास्पद व अमानवी प्रकार झाला होता तेंव्हा याच रमेश चव्हाणला मी सांगितले होते या लेंडीची किंमत करोडोमध्ये मोजावी लागले व घडलेही तसेच.
माझ्या घरावर मारेकरी पाठवणा-या खासदाराचेही मी त्यावेळी वस्त्रहरण केले होते,याचे विस्मरण होऊ नये.
मी सच्चाईसाठी लढतो म्हणुन मला मानणारे आदर करणारे ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आहेत. असे असले तरी मी वन मॅन आर्मी आहे. माझ्या विरोधात खोटा गुन्हा नोंदवला गेलाच तर मी जामीन न घेता जेलमध्ये जाईन मग त्याचे काय पडसाद उमटतात ते दिसेलच.
सरकार उलथवून टाकण्याची ताकद सच्या काॅमन मॅन मध्ये असते हे आणिबाणी नंतरच्या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधींचा पराभव करून राजनारायण यांनी सिद्ध केले होते.शिंदेंचे मिंधे सरकार जर मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट करीत असेल ती विषाची परीक्षा ठरेल !
गद्दारांचे काळे धंदे व गैरव्यवहार उघड करणे हा गुन्हा असेल तर मी तो शंभर वेळा करेन !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०